चंदगड/प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे मंजूर झाल्याने कोल्हापूरकरासाठी ही आनंदाची बाब आहे.यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागीरी, सिंधुदूर्ग या सहा जिल्ह्यातून सर्व वकीलबार असोसिएशनच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन,मोर्चे सुरू होते.यामध्ये चंदगड वकीलबार असोसिएशनचाही वाटा आहे. त्यामुळे चंदगड वकीलबार असोसिएशनच्या सर्व वकिलांचे विविध पक्ष,संघटनेच्यावतीने सर्व वकीलांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात ब्लॅक पॅंथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळे लोकांचा वेळ, पैसा, व मानसिक त्रास कमी होणार असल्याचे सांगून यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विशेष अभिनंदन करून त्यांचे आभार मानले.तसेच सर्व वकिलांचेही अभिनंदन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे चंदगड तालुका युवा अध्यक्ष पांडुरंग बेनके, सामाजिक कार्यकर्ते व जंगमहट्टी गावचे माजी सरपंच विष्णू गावडे यांनी मनोगत व्यक्त करून सर्व वकिलांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी चंदगड तालुका खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन तानाजी गडकरी,दौलत साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर गावडे, बार असोसिरिशनच्या अध्यक्षा ॲड. छाया पाटील,सर्व वकील मंडळी,ब्लॅक पँथर पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. दीपक कांबळे, पंडीत कांबळे, सुधाकर कांबळे, वैजनाथ कांबळे, प्रकाश कांबळे, नारायण किरमटे, नागेश कांबळे आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments