तानाजी पवार हे चंदगड तालुक्यात माजी मंत्री भरमु आण्णा पाटील व आमदार शिवाजीराव पाटील यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी विंझणे गावचे सरपंच म्हणून भक्ती, शक्ती आणि विकासाचा संगम साधणारे नेतृत्व दिले. त्यांच्या कार्यशैलीमुळे गावात ग्रामविकासाचे नवे अध्याय लिहिले गेले. या कार्याची दखल भाजप नेत्यांनी घेतली असून, त्यांच्याकडे तालुका पातळीवरील संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भरमु आण्णा पाटील यांच्याहस्ते तानाजी पवार यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी चंदगड भाजप मंडळ अध्यक्ष विशाल बल्लाळ, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष संतोष तेली, दीपक पाटील, शांताराम पाटील, महिला पदाधिकारी ज्योती दीपक पाटील, सचिन बल्लाळ, नेसरीचे सरपंच गिरिजादेवी नेसरीकर, नामदेव पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
निवडीनंतर तानाजी पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “चंदगड तालुक्यात पक्ष संघटनेची पाळेमुळे अधिक घट्ट करणे, तरुणांमध्ये पक्षप्रति आकर्षण वाढवणे आणि गावागावातील समस्यांवर प्रभावी मार्ग काढणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील.” तसेच, “ही जबाबदारी सन्मानासोबत जबाबदारीची आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरण्याचा मी प्रयत्न करेन,” असे त्यांनी नमूद केले.
राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने, तानाजी पवार यांची निवड ग्रामीण भागातील कार्यक्षम नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याचा भाजपचा प्रयत्न मानला जात आहे. चंदगड तालुक्यात भाजपची पकड वाढवण्यासाठी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नेमणूक रणनीतीचा भाग असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Post a Comment
0 Comments