चंदगड/प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तसेच ऑपरेशन सिंदूरच्या धर्तीवर आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज १४ ऑगस्ट रोजी चंदगड शहरामध्ये तिरंगा रॅली (पदयात्रा) काढण्यात आली.ही तिरंगा रॅली पंचायत समिती ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अशी पदयात्रा काढण्यात आली.यावेळी शालेय विद्यार्थी, युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
या पदयात्रेमध्ये उद्योजक लक्ष्मण गावडे,सचिन बल्लाळ,सुरेश नेसरीकर,विशाल बल्लाळ,अमेय सबनीस,ऍड. विजय कडुकर,सुधाकर गावडे यांच्यासह सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते,बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी, नगरसेवक,आजी माजी सैनिक, विद्यार्थी,सर्व चंदगड ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments