कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालया समोर इंडिया आघाडीकडून आंदोलन करण्यात आले.जनसामान्यांचा आवाज दाबणारा, घटनाविरोधी जनसुरक्षा कायद्याविरोधात आज इंडिया आघाडीकडून निषेध रॅली काढण्यात आली. हा अन्यायकारक कायदा रद्द करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करून यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना इंडिया आघाडीच्या वतीने देण्यात आले.
यावेळी काँगेस नेते सतेज पाटील,व्ही.बी.पाटील, आर. के. पोवार, संजय पवार, विजयराव देवणे, सचिन चव्हाण, राजू लाटकर, कॉ. संपत देसाई, कॉ. सतिशचंद्र कांबळे, कॉ. दिलीप पवार, कॉ. उदय नारकर, बाबुराव कदम, बाळासाहेब सरनाईक, भरत रसाळे, कॉ. अतुल दिघे, बाबासाहेब देवकर, कॉ. रघुनाथ कांबळे,कॉ. सुभाष जाधव, संजय मोहिते, अनिल घाटगे, भारतीताई पोवार, सरलाताई पाटील, चंद्रकांत यादव, सुभाष देसाई, यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments