चंदगड/प्रतिनिधी : महादेवराव बी एड कॉलेज,तुर्केवाडी अंतर्गत शालेय आंतरवासिता टप्पा 2 मधील मामासाहेब लाड विद्यालय, ढोलगरवाडी येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला.8 ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आणि या निमित्ताने शाळेमध्ये पारंपरिक वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. दुपारपर्यंत अध्यापनाचे वर्ग घेऊन 3.30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात केली.
साक्षरता दिन असल्यामुळे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून तसेच वृक्षाला जल अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक एन.जी.यळ्ळूरकर यांनी स्वीकारले.तसेच गटाचे (छात्रमुख्यद्यापक) महेश कांबळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी.व्ही सावंत यांनी केले. प्रास्ताविक सुजाता कांबळे यांनी केले व कार्यक्रमाची पार्श्वभूमी तसेच वेशभूषाविषयी मार्गदर्शन ज्योती चरापले यांनी व्यक्त केले.त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग दाखवला.आपल्या वेशभूषे विषयी सर्व विद्यार्थ्यानी माहितीही छान सांगितली. एकंदरीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.शेवटी आभार सोनाली पाटील यांनी मानले.

Post a Comment
0 Comments