सावकारी जाचातून मुक्त होण्यासाठी पतसंस्थांचे योगदान महत्त्वाचे-महेश कदम
चंदगड/प्रतिनिधी : ग्रामीण भागात पतसंस्था चालवल्या जात असल्यामुळे शेतकरी आणि सामान्य जनतेला सावकारी जाचातून मुक्त होण्यास मोठा हातभार लागतो, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक तथा विविध क्षेत्रीय सहकारी नेते महेश कदम यांनी केले. ते कोवाड (ता. चंदगड) येथील कोवाड मर्चंट पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात अध्यक्षस्थानी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष के. सी. पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेश कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कदम म्हणाले की, "पतसंस्था या केवळ आर्थिक व्यवहारापुरत्याच मर्यादित न राहता शेतकरी व सामान्य जनतेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करीत आहेत. त्यामुळे गावोगावी पतसंस्था सबळ झाल्या, तर ग्रामीण समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल व सावकारीचे संकट कमी होईल."
या सोहळ्यात संस्थेच्या गेल्या २५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष, संस्थापक सदस्य, माजी पदाधिकारी यांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले.यावेळी विष्णू जांबळेकर, एम. एस. पाटील, सुरेश घाटगे, सी. बी. पाटील, अजी-माजी सभासद व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत के. सी. पाटील यांनी केले तर प्रास्ताविक मनोज कदम यांनी मांडले. सुत्रसंचालन के. डी. पाटील यांनी केले व आभार गजानन मळवीकर यांनी मानले.
Post a Comment
0 Comments