Type Here to Get Search Results !

बेळगाव सकल मराठा समाज मुंबईला रवाना


सीमाभाग बेळगाव प्रतिनिधी/ रुपेश मऱ्यापगोळ : मुंबई येथे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मोर्चाला पाठिंबा देऊन प्रत्यक्षात मोर्चात सहभागी होण्यासाठी बेळगाव येथून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा शिष्टमंडळ मुंबईला आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी रवाना झाले. उद्या 1 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे मोर्चा स्थळी मनोज जरांगे पाटील यांना सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठिंबाचे पत्र  देण्यात येणार आहे. 


यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर,मा.नगरसेवक राजू बिर्जे,मुकेश बारदेश, अनंत पाटील, कृष्णा पन्हाळकर अजय खलाटे पाटील, शिवम पन्हाळकर, राजेंद्र बैलूर, विनायक बिरजे, ओमकार पन्हाळकर, गणेश शिंदोळकर,अंकुश केसरकर,चंद्रकांत कोंडुसकर,प्राचार्य आनंद आपटेकर,राजकुमार मोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments