(संपादक ज्ञानेश्वर पाटील यांनी ऍड.भारती गावडे-पाटील यांची घेतली भेट)
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात वकील भारती गावडे-पाटील यांनी अल्पावधीतच वकिली क्षेत्रात उल्लेखनीय नावलौकिक कमावले आहे. वंचित, शोषित, गोरगरीब व बहुजन समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्याची त्यांच्यातील क्षमता खरोखरच प्रेरणादायी आहे.चंदगडसारख्या दुर्गम भागातून येऊन त्यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले व आज कोल्हापूरात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.शोषित महिलांसाठी आवाज उठवणाऱ्या ऍड.भारती गावडे-पाटील यांची निवास्थानी महाराष्ट्र माझाचे संपादक ज्ञानेश्वर पाटील यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. व त्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी ते म्हणाले कि,"ऍड.भारती गावडे यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी असून वंचित, शोषित, गोरगरीब लोकांसाठी प्रामाणिक काम करतात, त्यामुळे त्यांचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद आहे"
याप्रसंगी प्रांत ग्राहक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे,संतोष हळदणकर,प्रा. डॉ. गुंडुराव कांबळे,सृष्टी कांबळे उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments