Type Here to Get Search Results !

शारदा शिक्षण सेवकांची पतसंस्था बसर्गे तर्फे सभासदांना दिवाळी भेट वाटप


(संस्थेच्या नफ्यातून १५% लाभांशानंतर सभासदांना भेट स्वरूपात पाच लिटर जेमिनी तेल व उटणे वाटप)


चंदगड/प्रतिनिधी : शारदा शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित,बसर्गे यांच्या वतीने दिवाळीच्या शुभप्रसंगी सभासदांना भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.  संस्थेचे संस्थापक व तज्ञ संचालक श्री. जे. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या चेअरमन सौ. संगीता पाटील यांच्या हस्ते भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.

    

याप्रसंगी व्हाइस चेअरमन प्रकाश बोकडे, संचालक वसंत व्हडगे, जयवंत कोकितकर, अशोक चिमणे, राजेंद्र शिवणगेकर, कल्पेश शिंदे , सचिव सट्टुप्पा पाटील आणि टी. एस. चाळक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शिवणगेकर यांनी केले तर आभार कल्पेश शिंदे यांनी मानले.सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेला झालेल्या नफ्यातून यापूर्वी सभासदांना १५ टक्के लाभांश (डिव्हीडंड) देण्यात आला होता. त्यानंतर आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या सर्व सभासदांना पाच लिटर जेमिनी तेल आणि उटणे भेटवस्तू स्वरूपात देण्यात आले.

    

संस्थेच्या सामाजिक व सहकारी बांधिलकीचा भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला असून, यामुळे सभासदांत समाधानाचे वातावरण आहे. सभासद कल्याण आणि आर्थिक पारदर्शकतेला प्राधान्य देणाऱ्या शारदा शिक्षण सेवकांची पतसंस्था सातत्याने  सहकारभावनेची नवी उंची गाठत आहे.

Post a Comment

0 Comments