Type Here to Get Search Results !

दानशूर समूहाकडून श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात!



चंदगड/प्रतिनिधी : गीतरचना, गायन या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे, सामाजिक चळवळीत नेहमी अग्रेसर असणारे श्रीपती कांबळे,रा. कानडी, ता. चंदगड यांचे गेल्या महिन्यात आकस्मित निधन झाले.अठरा विश्वे दारिद्र्याशी दोन हात करणाऱ्या लोककलाकाराला काळाने हिरावून नेला. त्यांच्या पश्चात त्यांची सतत आजारी असणारी पत्नी आणि 100% अपंग असलेली दोन मुले ही अचानक झालेल्या या आघातामुळे कोलमडून पडली, निराधार झाली.त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार आणि त्याचबरोबर आर्थिक पाठबळ देणे अत्यंत आवश्यक होते.अशातच सोशल मीडिया व न्युजपेपर, चॅनेल याद्वारे श्रीपती कांबळे यांच्या निधनाची बातमी व्हायरलं झाली असता तालुक्यातील काही दानशूर व्यक्तींनी मदत केली.


श्रद्धांजली वाहिली पाहिजे पण वाळली सहानुभूती दाखवून दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर करता येत नाही. त्यासाठी कृतिशील मार्ग महत्वाचा असतो. हे लक्षात घेवून काही वैचारिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक मोहीम राबवलेले होते.याअंतर्गत समाजातील दानशूर आणि संवेदनशील लोकांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली. ही मदत एकत्र गोळा केली असता ₹ 65,000/-  इतका निधी जमा झाला.समाजामध्ये आजही माणुसकी आणि संवेदनशीलता जिवंत असल्याचे हे द्योतक आहे. या जमा रकमेपैकी ₹ 50,000/- चे मुदतबंद ठेव श्रीमती मंगल श्रीपती कांबळे यांच्या नावे केले. ₹ 10,000/- रोख व 5,000/-चे गृहोपयोगी साहित्य त्यांचे घरी जाऊन सु्फूर्द करण्यात आले. 


यावेळी प्रा. आर. पी. पाटील, प्रा. गुरुबे, प्रा.ए. डी. कांबळे,प्रा. एम. एस. दिवटे,आयु. दिपक माने, माणगाव,आयु. रविंद्र कांबळे, दाटे,आयु. चंद्रकांत कांबळे, कुदनूर,आयु. राहुल कांबळे, नाशिक,आयु. अनंत कांबळे, कोरज - सरपंच यासह अन्य कानडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments