चंदगड/प्रतिनिधी : भारताचे सरन्यायाधीश भुषण गवई यांचेवर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ चंदगड येथे चंदगड तालुक्यातील विविध पक्ष- संघटनांच्यावतीने निदर्शने करून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,माथेफिरू राकेश किशोर याने आदरणीय भुषण गवई साहेबांच्यावर केलेला हल्ला म्हणजे भारतीय संविधानावर केलेला हल्ला आहे. तेव्हा अशा मनुवादी, सनातनी माथेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कडक शिक्षा करण्याची मागणी विविध संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी जि. प . चे माजी शिक्षण सभापती भरमाना गावडा,ब्लॅक पँथर पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, नामदेवराव कांबळे, संदीप कांबळे, पांडूरंग कांबळे यांनी मनोगत व्यक केले. रामजी कांबळे यांनी आभार मानले.यावेळी बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे पांडुरंग कांबळे,भिकाजी कांबळे भोगोलीकर, सरपंच राजेंद्र कांबळे, सरपंच आनंद कांबळे,शाहीर मधुकर कांबळे,पंडीत कांबळे, विकी कांबळे, सागर शिवनगेकर, हेरेचे राजू कांबळे, कोळींद्रेचे मनोज कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments