Type Here to Get Search Results !

कालकुंद्रीत ज्ञानदीप वाचनालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

(CET व शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव — मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुस्तक भेट


खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक एम. बी. पाटील सर यांचाही विशेष सत्कार — वाचनालयाच्या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


चंदगड/प्रतिनिधी : कालकुंद्री येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक एम. बी. पाटील होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.हि. आर. पाटील यांनी केले.याप्रसंगी CET परीक्षेत 99.97% गुण मिळवणाऱ्या कु. राणापृथ्वीराज गजानन पाटील, तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या कु. निशाद संदीप पाटील, कु. जान्हवी विश्वास पाटील आणि कु. शार्दुल आप्पाजी पाटील या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, गौरवपत्र व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी एम. बी. पाटील यांचा देखील वाचनालयास दिलेल्या सहकार्याबद्दल व संचालकपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात एम. बी. पाटील,झेवियर क्रूझ,गजानन पाटील व आप्पाजी पाटील यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले.याप्रसंगी माजी सरपंच सुरेश नाईक, शाळा समिती अध्यक्ष दीपक कालकुंद्रीकर, सामाजिक कार्यकर्ते एस. के. मुर्डेकर, तसेच ईश्वर वर्पे, नारायण पाटील, सुदर्शन पाटील, दीपक पाटील व शिरीष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन वाचनालयाचे अध्यक्ष के. जे. पाटील यांनी मानले.गावातील विद्यार्थी, पालक, वाचक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

Post a Comment

0 Comments