(आमदार राजेश पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा चेक सुपुर्द केला,आपत्तीतील मदतीचा मानवी भाव जिवंत ठेवत चंदगड तालुका संघाचे सामाजिक भान अधोरेखित)
चंदगड/प्रतिनिधी : काही दिवसापूर्वी मराठवाडा, विदर्भ, धाराशिव, सोलापूर, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पुरग्रस्तांना दिलासा म्हणून चंदगड तालुका खरेदी विक्री संघाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
संघाचे चेअरमन मा. आमदार राजेश पाटील यांनी ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याची घोषणा संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली होती. त्यानुसार ८ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना ही मदतीची धनादेश सुपुर्द करण्यात आली.यावेळी संघाचे व्यवस्थापक एस. वाय. पाटील आणि दौलत साखर कारखान्याचे माजी सेक्रेटरी एस. एल. पाटील उपस्थित होते.२०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरावेळी महाराष्ट्रातील अनेकांनी मदतीचे हात पुढे केले होते, ही जाणीव ठेवून चंदगड तालुका संघाने आज मानवी संवेदनांचा आदर्श निर्माण केला आहे.
Post a Comment
0 Comments