Type Here to Get Search Results !

कार अपघातप्रकरणी गौतमी पाटीलला पुणे पोलिसांची नोटीस


पुणे/प्रतिनिधी : कार अपघातप्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस पाठवली आहे.गौतमी पाटीलच्या चालकाला पोलिसांनी आधीच अटक केलीय.मंगळवारी पहाटे पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका भरधाव वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.अपघातानंतर कारचालकहीं फरार झाला होता.मात्र सीसीटीव्हीच्या आधारे चालकाला अखेर अटक केलीय.एकंदरीत कार ही गौतमी पाटीलच्या नावाने असल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवली असून या अपघात प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments