चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील पश्चिम भागातील युवकांनी एकत्र येत पूरग्रस्तांना एक वेगळी मदत व्हाट्सअप ग्रुपच्या सहाय्याने केली आहे.जांबरे-आडूरे-नागवे घडामोडी हा व्हाट्सअप ग्रुप समाजाच्या कल्याणासाठी सक्रिय असून पुन्हा एकदा या ग्रुपद्वारे चांगले कार्य पाहायला मिळाले.
काही दिवसापूर्वी मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अनेक पूरबाधित कुटूंब उध्वस्त झाली.त्यामुळे त्यांना छोटीशी मदत म्हणून या ग्रुपद्वारे मदतीचे आवाहन करण्यात आले.त्यानंतर शेकडो मुलांनी आपापल्या परीने ऑनलाईन पैसे पाठवत सहकार्य केले.अखेर आलेल्या रक्कमेतुन शेकडो जीवनावश्यक किट घेण्यात घाले व आमदार कार्यालय येथे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.यावेळी भागातील युवक उपस्थित होते
जांबरे-आडूरे-नागवे घडामोडी या व्हाट्सअप ग्रुपमध्ये आडूरे,कोकरे,किरमटेवाडी,न्हावेली,पेडणेकरवाडी,माळी,खळणेकरवाडी,धुरीवाडी, उमगाव,सावतवाडी,जांबरे,नागवे यासह आदी गावातील स्थानिक नागरिक व युवक, नोकरदार वर्ग यांचा सहभाग आहे.हा ग्रुप सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असतो.
Post a Comment
0 Comments