![]() |
पात्र लाभार्थ्यांनी त्वरित तहसील कार्यालयात कागदपत्रे जमा करावीत-आशिष कुतीनो यांचे आवाहन.
चंदगड : महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत विधवा महिलांसाठी पेन्शन रक्कम ₹१५०० वरून वाढवून ₹२५०० रुपये केली आहे. मात्र, काही लाभार्थ्यांना अजूनही जुन्या दरानेच ₹१५०० पेन्शन मिळत असल्याचे समोर आले आहे. तसेच, चंदगड तालुक्यातील काही दिव्यांग बंधू-भगिनींनाही वाढीव ₹२५०० पेन्शन अद्याप मिळालेली नाही, अशी माहिती स्वावलंबी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आशिष कुतीनो यांनी दिली.
कुतीनो यांनी सांगितले की, शासनाने पेन्शन वाढविल्यानंतरही अनेक पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव अद्याप प्रक्रियेतच अडकले आहेत. त्यामुळे ज्या दिव्यांगांना अद्याप ₹२५०० पेन्शन मिळाली नाही, त्यांनी त्वरित तहसील कार्यालय, चंदगड येथे जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
यामध्ये —
दिव्यांग कार्डाची झेरॉक्स प्रत,
आधार कार्ड, आणि
बँक पासबुकची झेरॉक्स प्रत
ही कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.या संदर्भातील निवेदनावर मारुती पाटील, शिवाजी यादव, प्रथमेश पाटील, सुरज पाटील, विजय मासरणकर, जोतिबा केसरकर, तानाजी यादव, साक्षी बागल आणि कविता जाधव यांच्या सह्या आहेत.संस्थेने प्रशासनाला विनंती केली आहे की, शासनाच्या निर्णयानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर वाढीव पेन्शन रक्कम देण्यात यावी, जेणेकरून गरजू नागरिकांना दिलासा मिळेल.
“पेन्शन वाढीचा शासन निर्णय जाहीर झाला असला, तरी काहींना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. चंदगड तालुक्यातील दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांच्या हक्काच्या रकमेचा प्रश्न आता तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला आहे — प्रशासनाने त्वरित दखल घेणे आवश्यक आहे.”

Post a Comment
0 Comments