चंदगड/प्रतिनिधी : र.भा.माडखोलकर कॉलेज चंदगड येथे वन्यजीव सप्ताह निमित्त जनजागृत्तीपर कार्यक्रम पार पडला.अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य एस.डी.गोरल होते.तर प्रमुख पाहुणे तुषार गायकवाड (परीक्षेत्र वन अधिकारी चंदगड), कृष्णा डेळेकर (वनपाल चंदगड) होते.
या कार्यक्रमामध्ये साप,सापांच्या प्रजाती,समज व गैरसमज याबाबत वन्यजीव अभ्यासक व निसर्ग मार्गदर्शक विकास माने यांनी मार्गदर्शन केले.वन्यजिवांची ओळख व त्यांचे पर्यावरणीय महत्त्व याबाबत विजय पाटील वन्यजीव अभ्यासक यांनी मार्गदर्शन केले.तर आभार वनअधिकारी तुषार गायकवाड यांनी मानले.सूत्रसंचालन श्रीमती कांडण यांनी केले.या कार्यक्रमप्रसंगी वनविभाग वनपरिक्षेत्र चंदगडचे वनरक्षक सागर कोळी,वनरक्षक मौला मुबारक सनदी,वनरक्षक श्रीमती सादिया तांबोळी,वनरक्षक आकाश मानवतकर,वनपरिक्षेत्र चंदगड चे सर्व वनसेवक व वन्यजीव बचाव पथक सदस्य,तसेच कॉलेजचे झुलॉजी विभाग प्रमुख प्रा. निकम,प्रा. गायकवाड, प्रा. दिवटे,आर.एन. पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments