चंदगड/प्रतिनिधी : कारखान्याच्या फायद्यासाठी AI तंत्रज्ञान चा वापर न नको,शेतकऱ्यांची हित हे या तंत्रज्ञांमध्ये जपा,या तंत्रज्ञानाच्या वापराने कृषी उत्पन्ना मध्ये वाढ होईल.ही वाढ शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे पण त्याचबरोबर कारखानदारांचाही फायदा होणार आहे तसेच या तंत्रज्ञाच्या आधारे सर्वकाटे ऑनलाईन करा .देशातील लाखो पेट्रोल पंप ऑनलाईन जोडले जाऊ शकतात तर महाराष्ट्रातील दोनशे साखर कारखाने का जोडले जाऊ शकत नाहीत. साखर कंट्रोल ऍक्ट 1996 हा शेतकऱ्यांच्या बाजूने असला तरी 2022 मध्ये महाराष्ट्र शासनाने अधिकार नसताना यामध्ये बदल केला. त्यासाठी मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली अनेक दिवस केस बोर्डावरती येत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय केस जलद गतीने चालली जवळजवळ 50 तास यावरती कोर्टासमोर केस चालली आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला. या विरोधामध्ये सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आहे .FRPचे तुकडे करण्यामध्ये सर्व कारखानदारांचे एकमत आहे सरकार त्यांच्या पाठीशी आहे आपण ही शेतकऱ्यांनी एकजुट दाखवली पाहिजेत अन्यथा एफ आर पी चे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाहीत. शेतकऱ्यांची एकजूट दाखविण्यासाठी 16 ऑक्टोबर च्या 24 व्या ऊस परिषदेमध्ये सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने FRP ची लढाई आम्ही लढतोच आहे पण चंदगड आजरा गडहिंग्लज भागातील कारखानदारांनी 2022- 23चे पन्नास रुपये देण्याची लेखी पत्र जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिलय ते आम्ही वसूल करूच तसेच पूरग्रस्तांसाठी सरकारने जर प्रति टन 15 रुपये कपातीचे धोरण अवलंबले तर आम्ही त्याला विरोध करू कारण मुळात शेती परवडणारी नाही मग आमच्याच ताटातील तुम्ही का काढून घेता असा सवाल राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर यांनी केला
दीपक पाटील यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले,या भागामध्ये हत्ती गवा आणि आता रानडुक्कराचा मोठा त्रास आहे नदी किनारी रान डुकरांचे कळपमुळे मोठे नुकसान झाले आहे वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा वाढणाऱ्या डुकरांची संख्या पाहता शेती करणे अवघड होणार आहे. यावेळी जगन्नाथ हुलजी,बाळाराम फडके,जानबा चौगुले यांचीही भाषणे झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशिल शेतकरी सुनील पाटील होते. यावेळी तानाजी गडकरी ,उपसरपंच बाबुराव दुकळे, सरपंच प्रकाश बांगडी, मारुती पाटील कृष्णा रेगडे,पांडुरंग बेंनके, सतीश सबनीश विरुपक्ष कुंभार विश्वनाथ पाटील उपस्थित होते.आभार गोपाळ गावडे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments