Type Here to Get Search Results !

शिनोळीत विकासकामांना मोठी गती-एकूण 31 लाख 25 हजारांचा निधी मंजूर

 


(माजी आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश,ग्रामस्थ,लोकप्रतिनिधी आणि महिलांचा मोठा सहभाग)



चंदगड/प्रतिनिधी : शिनोळी (ता. चंदगड) येथे आज विकासकामांची मोठी सुरूवात झाली. माजी आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे डोंगरी विकास योजनेतून अंगणवाडी बांधकामासाठी ११ लाख २५ हजार, तर नागरी सुविधा योजनेतून ग्रामपंचायत सभागृह बांधकामासाठी २० लाख असा एकूण ३१ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या दोन्ही कामांचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.अंगणवाडी बांधकामामुळे लहान बालकांसाठी सुरक्षित व सुसज्ज शिक्षण-आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे. तर नव्या सभागृहाच्या बांधकामामुळे ग्रामपंचायतीच्या बैठका, कार्यक्रम, प्रशिक्षण उपक्रम यांना योग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच परशराम पाटील होते. प्रमुख उपस्थितीत तंटामुक्त समिती अध्यक्ष एस. वाय. पाटील,माजी जि.प. सदस्य अरुण सुतार,केतन खांडेकर, प्रताप सूर्यवंशी, महेश पाटील,प्रकाश सुतार, चंद्रकांत पाटील, परशराम बिरजे,इराप्पा पाटील,अर्जुन खांडेकर, रामलिंग पाटील तसेच गावातील सर्व मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य आणि महिला वर्गाची मोठी हजेरी होती.कार्यक्रमात श्रीराम विद्या मंदिरचे शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.




प्रास्ताविक भरमाणा यल्लाप्पा पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन प्रताप सूर्यवंशी यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. के. पाटील यांनी केले.या दोन्ही कामांमुळे गावाच्या सामाजिक सुविधांना बळ मिळणार आहे. अंगणवाडी व सभागृह ही दोन्ही केंद्रं गावाच्या विकासाचा नवा टप्पा ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments