Type Here to Get Search Results !

कुदनूर ग्रामपंचायतीतर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न



कुदनूर (ता. चंदगड) : कुदनूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील सुमारे 60 ते 80 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. ग्रामीण भागात आरोग्य सेवांचा थेट गावात लाभ मिळावा या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.


शिबिरात अस्थिरोग (हाडांचे आजार), शुगर, बीपी तपासणी, तसेच विविध आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. अस्थिरोग तज्ञ — अर्थो ट्रॉमा सेंटर, बेळगाव येथील डॉ. देवगोडा, डॉ. संदेश जाधव, तसेच फिजिओथेरपिस्ट डॉ. ऐश्वर्या यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार,व्यायाम, काळजी आणि जीवनशैलीबाबत मार्गदेशन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच संगीता घाटगे होत्या.तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक भागाना नागरदळेकर,मारुती खामकार,तानाजी आंबेवाडकर,वसंत आंबेवाडकर,नारायण निर्मळकर आदी मान्यवर उपस्थित होते.




गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात हाडदुखी, सांधेदुखी,शुगर आणि बीपीसारखे जीवनशैलीजन्य आजार यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.अशा स्थितीत तज्ञ डॉक्टर्स थेट गावात येऊन तपासणी करणे, सामान्य लोकांपर्यंत योग्य निदान व सल्ला पोहोचवणे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.


या शिबिरातून —
✔ नागरिकांना आजाराचे लवकर निदान मिळाले
✔ योग्य उपचार पद्धतीबाबत योग्य माहिती मिळाली
✔ आजार टाळण्यासाठी सवयी, आहार आणि व्यायामाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचले ग्रामीण आरोग्य जनजागृतीत महत्त्वपूर्ण भर पडली
कुदनूर ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे गावातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments