नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : सामाजिक न्याय विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची गडहिंग्लज तालुक्यात नवी नियुक्ती करण्यात आली असून अध्यक्षपदी हिटणी येथील सामाजिक कार्यकर्ते बसवराज शंकर कंकणवाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या समितीत खालील सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे
1)सुभाष चोथे,भडगाव
2)अशोक पांडव,नेसरी
3)चंद्रशेखर पाटील,बसर्गे
संजय गांधी निराधार अनुदान योजना ही शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना असून निराधार वृद्ध विधवा अपंग व सामाजिक दृष्ट्या वंचित घटकांना मासिक आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे दिले जाते.नव्याने नियुक्त झालेल्या समितीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मंजूर होण्यासाठी अधिक पारदर्शक आणि सर्व कार्यपद्धती राबविली जाणार आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक पांडव यांनी यापूर्वी देखील निराधार विधवा महिलांना पेन्शन मिळवून द्यायचे काम केले असून आमदार शिवाजीराव पाटील यांच्या शिफारसनुसार निवड करण्यात आली.
पदभार स्वीकारल्यानंतर अशोक पांडव म्हणाले कि,
"तालुक्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाचा लाभ पोहोचविण्यासाठी नेहमी प्रयन्त करू"असे मत नेसरी प्रतिनिधी संजय धनके याच्याशी बोलताना व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments