(ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व स्थानिक शिक्षक-ग्रामस्थांच्या सहभागाने शिबिर यशस्वीपणे पार)
चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : जांबरे ता. चंदगड ग्रामपंचायततर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आयोजित केलेले महिला विशेष आरोग्य शिबिर उत्साहात व यशस्वीपणे पार पडले. शिबिरात विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या असून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये 87 महिलांची रक्त तपासणी तर 54 महिलांची ईसीजी तपासणी तसेच हिमोग्लोबिन,सर्वसाधारण आरोग्य तपासणी, ब्लड प्रेशर आदी चाचण्या करण्यात आल्या.
शिबिराचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक घटकांनी परिश्रम घेतले.सरपंच विष्णू गावडे, ग्रामसेवक अश्विनी कुंभार, उपसरपंच रामकृष्ण गावडे, तसेच सई रेडकर यांनी नियोजनात तत्परता दाखवली.प्राथमिक आरोग्य केंद्र, कानूर येथील आरोग्य सहाय्यक शेळके,आरोग्य सेविका सौ.कुरणे,सौ.गावडे,सौ.खुडे,आरोग्य सेवक मुकाडे कुडचीकर,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आर. ए. पाटील, नाईक,गटप्रवर्तक सौ.चंदगडकर तसेच आशा सेविका संजना निवगुरे, प्रतीक्षा गावडे, शांता देवरमणी यांनी तपासणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला.
या शिबिराच्या व्यवस्थापनासाठी मुख्याध्यापक दीपक गोरे,श्री.तिडके,श्री.पेडणेकर,गजानन गावडे, नागेश गावडे,सुभाष कांबळे यांच्यासह गावकऱ्यांनीही मोठी मदत केली.जांबरे ग्रामपंचायतद्वारे राबविण्यात आलेले हे आरोग्य शिबिर महिलांसाठी आरोग्य तपासणी तसेच जागृतीचे एक महत्त्वाचे पाऊल ठरले. स्थानिक पातळीवर अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.



Post a Comment
0 Comments