Type Here to Get Search Results !

चंदगड नगरपंचायत निवडणूक २०२५ : नामनिर्देशनाच्या चौथ्या दिवशी ८ उमेदवारांचे अर्ज दाखल

 


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील एकमेव चंदगड नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोमात सुरू आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज चौथ्या दिवशी एकूण ८ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.


प्रभाग-आधारे अर्ज दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे—


प्रभाग ६ – आझाद गल्ली: शानूर मोहम्मदअली पाच्छापुरी


प्रभाग ८ – गुरुवार पेठ: जयश्री संतोष वनकुद्रे


प्रभाग १० – रवळनाथ गल्ली: सुनिता सुशील हळवणकर व प्रियांका सतीश परीट


प्रभाग ३ – नवीन वसाहत: आनंद मारुती हळदणकर


प्रभाग १५ – नगरपंचायत समोर: प्रसाद गणपती वाडकर


प्रभाग ५ – पप्पू कॉलनी/बेळगाव रोड: मोहम्मदअली इस्माईल नाईक


प्रभाग १६ – ब्राह्मण गल्ली: शितल रामनाथ गुळामकर



याशिवाय, १३ नोव्हेंबर रोजीही काही उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले होते.

त्यात—


प्रभाग ११: मनोहर कृष्णा गडकरी


प्रभाग १०: सरिता संतोष हळदणकर


प्रभाग १: पूनम प्रदीप फडते


प्रभाग ९: अनुसया श्रीकृष्ण दाणी



यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.


चंदगड नगरपंचायत निवडणुकीत सर्व पक्षांचे आणि अपक्ष इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरळीत सुरू असून प्रशासनाकडून आवश्यक ती सुविधा करण्यात आल्या आहेत. वाढत्या उमेदवारी अर्जांमुळे चंदगडमध्ये निवडणुकीची रंगत वाढताना दिसत आहे.


दरम्यान, उमेदवारी नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख सोमवार, दिनांक १७ नोव्हेंबर असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. त्यानंतर छाननी, अर्ज मागे घेण्याच्या तारखा आणि अंतिम यादी जाहीर होणार आहे.निवडणूक प्रक्रिया पुढील काही दिवसांत आणखी वेग घेणार असून चंदगड नगरपंचायतीचा राजकीय तापमानही वाढताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments