चंदगड (प्रतिनिधी): चंदगड तालुक्यातील दुंडगे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत शेतात काम करणाऱ्या आठ शेतकऱ्यांसह नऊ जनावरांना चावा घेतला.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.या जखमींवर कोवाड प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
रांगी’ नावाच्या शेतात दुपारच्या सत्रात भात मळणीदरम्यान शेतकरी भात कापणी व मळणी करत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवला.आरडाओरड सुरू होताच शेतकरी जीव वाचवण्यासाठी पळू लागले; मात्र कुत्र्याने सलग अनेकांना चावा घेतला. जखमींमध्ये सरिता शिवाजी गवेकर, विमल संभाजी पाटील, भरमू मारुती पाटील, निकेश अरविंद कांबळे, संतोष मनोहर वडर यांचा समावेश आहे.

Post a Comment
0 Comments