चंदगड : बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथील सत्यशोधक लीगल असोसिएटच्या प्रमुख सुजाता गुंडुराव कांबळे उर्फ ऍड.भारती-गावडे पाटील यांचा त्यांच्या वकीली क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.संघटनेचे प्रमुख कार्याध्यक्ष भिकाजीराव भोगोलिकर, बहुजन संघटक पी. डी. सरवदे आणि पांडुरंग कांबळे यांच्याहस्ते भारतीय संविधानाची प्रत देऊन त्यांना गौरविण्यात आले.
चंदगड तालुक्यासारख्या दुर्गम भागातून पुढे येत अल्पावधीतच कोल्हापूरसारख्या मोठ्या केंद्रात वकिलक्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या एडवोकेट भारती-गावडे पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव भोगोलिकर म्हणाले :
“एडवोकेट भारती-गावडे पाटील या न्याय, समता आणि मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या निर्भीड वकील आहेत. समाजातील वंचित व पीडित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे.”
यावेळी बोलताना बहुजन संघटक पी. डी. सरवदे म्हणाले :
“ चंदगड सारख्या दुर्गम भागातून आलेल्या एका महिला वकिलाने कोल्हापूरमध्ये इतक्या कमी वेळात स्थान निर्माण करणे ही प्रेरणादायी बाब आहे. सत्यशोधक विचार आणि सामाजिक भान यांचा अनोखा संगम त्यांच्या कार्यात दिसतो.” आमच्या बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या त्या कायदेशीर सल्लागार आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो.
यावेळी पांडुरंग कांबळे यांनी बोलताना सांगितले की,
न्यायव्यवस्थेत प्रामाणिकपणा आणि मानवी मूल्यांची जपणूक करत एडवोकेट गावडे -पाटील काम करतात. गरजूंना विनामोबदला मदत करत त्या समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहेत.”
एडवोकेट भारती गावडे -पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की,“हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणे ही माझी जबाबदारी असून, पुढील काळातही हे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार आहे. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी संघटनेची आणि सर्व मान्यवरांची मनःपूर्वक ऋणी आहे.”कार्यक्रमाचे आभार कुमारी सृष्टी कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments