Type Here to Get Search Results !

चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; १७ केंद्रांवर उद्या मतदान प्रक्रिया

 


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून उद्या (२ डिसेंबर) मंगळवारी एकूण १७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व केंद्रांवर केंद्राध्यक्ष व तीन राखीव अधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे.यापैकी आठ केंद्रे बुरखाधारी केंद्रे असून त्यात केंद्र क्रमांक ३, ४, ५, ६, १०, ११, १२ आणि १३ यांचा समावेश आहे. मतदान सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत होणार आहे.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालये, कंपन्या, सार्वजनिक व शैक्षणिक संस्था उद्या बंद राहणार आहेत.प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. “मतदान म्हणजे लोकशाहीची ताकद, प्रत्येकाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे,” असा संदेशही देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments