Type Here to Get Search Results !

चंदगड तालुक्यात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव चाचणीची तयारी पूर्ण,प्रशासनाकडून कौतुक

 


2️⃣ १० जानेवारी रोजी तालुक्यातील १,४५० विद्यार्थ्यांना सराव चाचणीचा लाभ


3️⃣ शिक्षक समिती व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या उपक्रमाचे प्रशासनाकडून कौतुक


राजेंद्र शिवणगेकर /चंदगड : चंदगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती सराव चाचणीच्या तयारीला वेग आला आहे. या अनुषंगाने सराव चाचणीच्या प्रश्नपत्रिका चंदगड तालुक्याच्या गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्त करण्यात आल्या.यावेळी शिक्षक समितीचे अध्यक्ष राजाराम जोशी, कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विजय कांबळे, शिक्षक समितीचे सरचिटणीस विनायक पाटील,पतसंस्थेचे संचालक संजय ढेरे तसेच बीआरसीचे सुनील पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी, चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी शिक्षक समिती व कास्ट्राईब शिक्षक संघटनेने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले. अशा सराव चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.

शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी ही सराव चाचणी चंदगड तालुक्यातील सर्व केंद्रांवर एकाचवेळी घेण्यात येणार असून, तालुक्यातील तब्बल १,४५० विद्यार्थ्यांना या सराव चाचणीचा लाभ मिळणार आहे.या उपक्रमामुळे चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळून त्यांच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळणार असून, भविष्यात शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्याचा निकाल अधिक उजळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments