Type Here to Get Search Results !

ग्रामसभा तात्काळ लावून दोषी आढळणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्यात यावी-नागवे,इनाम कोळीद्रे ग्रामस्थांची मागणी


चंदगड/प्रतिनिधी : 'सामाजिक लेखा परीक्षण अहवाल तयार करण्यासाठी तातडीची ग्रामसभा घेण्याबाबत नागवे व इनाम कोळीद्रे येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.


या निवेदनात म्हटले आहे कि,गेल्या पाच वर्षातील ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत आम्ही वेळोवेळी तोंडी व लेखी सूचना देऊन देखील कारभारामध्ये बदल होत नाही आहे.काही माहिती आम्ही मागवली असता त्या माहितीमध्ये आम्हाला बरीचशी तफावत आढळून आली आहे.तसेच सार्वजनिक कामासाठी निधी व खर्च चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे.या संदर्भात योग्य ती चौकशी करावी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तात्काळ ग्रामसभा लावण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी लावून धरली आहे.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



नागवे–ईनाम कोळींद्रे येथे अंगणवाडी व शाळा दुरुस्ती, गावातील अंतर्गत गटारे व रस्ते दुरुस्ती, तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शनची कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले,मात्र प्रत्यक्षात ही कामे झालेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.यामुळे गावात आजही नियमित पाणीपुरवठा होत नाही,गटारे स्वच्छ नाहीत आणि नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे.तसेच शालेय खर्च, इतर खर्च,रोजगार हमी योजना व घरकुल हप्ता,वृक्ष लागवड या सर्व विभागातील खर्चामध्ये बरेच तफावत आहे.



ग्रुप ग्रामपंचायत नागवे–ईनाम कोळींद्रे येथील गेल्या पाच वर्षांतील कारभारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.तसेच भ्रष्टाचारामध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्यात यावी.

Post a Comment

0 Comments