Type Here to Get Search Results !

राजश्री गावडे यांचा शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल

 


चंदगड प्रतिनिधी (रुपेश मऱ्यापगोळ ) : अडकुर जिल्हा परिषद मतदार संघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजश्री लक्ष्मण गावडे यांनी भव्य शक्ती प्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.चंदगड येथील र.भा.माडखोलकर कॉलेज पासून रॅलीला सुरुवात झाली.ही रॅली बाजारपेठ, रवळनाथ मंदिर मार्गे वाद्यांच्या गजरात तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आली.रॅलीनंतर उत्साहपूर्ण वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

 


यावेळी आमदार शिवाजीराव पाटील,माजी रोहयो मंत्री भरमु अण्णा पाटील,नगराध्यक्ष सुनील काणेकर,विष्णू गावडे,विनया गावडे,सुधाकर गावडे यांच्यासह अडकूर मतदारसंघातील कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शक्ती प्रदर्शनामुळे अडकूर मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणुकीत चुरस वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments