Type Here to Get Search Results !

नेसरी-दड्डी बस कायमस्वरूपी सोडावी-विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी


नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : नेसरी हे आजरा - गडहिंग्लज व चंदगड या तिन्ही तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण असून माजी आमदार कै.तुकाराम कृष्णाजी कोलेकर यांच्या आशीर्वादाने विद्येचे माहेरघर समजले जाते.येथे आसपासच्या गावाबरोबरच सीमा भागातील कर्नाटक मधून दड्डी- कोट,बेळंकी,मोदगे येथील बरेचसे विद्यार्थी नेसरी येथे शिक्षणासाठी येत असतात.त्यांना नेसरी वाहतूक नियंत्रक कक्षातून सवलतीच्या दरातील पास देखील देण्यात आले आहेत.


पण गडहिंग्लज आगाराकडून नेसरी-दड्डी ही गाडी वारंवार रद्द केली जाते.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.सध्या काही दिवसांवर बारावी व दहावीच्या परीक्षा आल्या असून नेसरी वाहतूक नियंत्रकांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा.गडहिंग्लज आगार व्यवस्थापक यांच्याकडे लेखी पाठपुरावा करण्यात आला असून नेसरी -दड्डी ही गाडी दररोज सोडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.


Post a Comment

0 Comments