Type Here to Get Search Results !

अडकूर भागात गावपातळीवरील अनुभव असलेल व्यक्तीमत्व-जि.प.उमेदवार अलकनंदा अंबादास पाटील

 


चंदगड/प्रतिनिधी : कानूर,पिळणी व इतर भागात सामाजिक क्षेत्रात मोठी पकड असलेले भारतीय आर्मीचे माजी जवान व कानूर गावचे सरपंच अंबादास पाटील यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात कानूर गावचा विकास माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून केला आहे.त्यांचा जनसंपर्क मोठा असून ते नेहमी कार्यतत्पर असतात.त्यांचा वारसा घेऊन त्यांच्या पत्नी अलकनंदा अंबादास पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.


राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जि.प.च्या उमेदवार अलकनंदा पाटील यांच्या प्रचाराला भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यांचे सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान असून त्यांनी महिलांच्या बरोबरीने युवकांच्या प्रश्नाना प्राधान्य देणार असल्याचे प्रचारादरम्यान सांगितले.तसेच येत्या काळात जनतेने संधी दिल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार व आमचे नेते राजेश पाटील यांच्या माध्यमातून प्रलंबित कामे मार्गी लावत भागाचा कायापालट करू अशी प्रतिक्रिया दिली.भागातील नागरिकाच्या अडी-अडचणीमध्ये धावून जाणारे अंबादास पाटील व त्यांच्या पत्नी यांनी नेहमी लोकांच्या कामांना प्राधान्य दिल्याने चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा वेगळा ठसा आहे.एकंदरीत ही निवडणुकीत लढत अती तटीची होणार असून सर्वसामान्य लोकांसाठी धावणाऱ्या आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी द्या असे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments