Type Here to Get Search Results !

दिव्यांग नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टीत ५० टक्के सवलत तात्काळ लागू करण्याची मागणी



2️⃣ चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ५ टक्के दिव्यांग निधी देण्याबाबत आदेश काढण्याची मागणी

3️⃣ स्वावलंबी बहुद्देशीय संस्थेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन; दिव्यांग हक्कांसाठी ठाम भूमिका


राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : चंदगड तालुक्यातील दिव्यांग नागरिकांच्या हक्कांसाठी स्वावलंबी बहुद्देशीय संस्था, चंदगड यांच्या वतीने गटविकास अधिकारी चंदगड यांना निवेदन सादर करण्यात आले. शासन निर्णय क्रमांक कार्या. १२.२ संकीर्ण आर आर १०२९/२०२० नुसार दिव्यांग व्यक्तींना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलत देणे बंधनकारक असतानाही तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींकडून याची अंमलबजावणी होत नसल्याची बाब संस्थेने निदर्शनास आणून दिली.


दिव्यांग बांधव-भगिनींसाठी ही सवलत केवळ सुविधा नसून तो त्यांचा अधिकार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चंदगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना तात्काळ आदेश काढून ही सवलत लागू करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.तसेच, ग्रामपंचायतींना बंधनकारक असलेला ५ टक्के दिव्यांग निधी अनेक ठिकाणी वितरित केला जात नसल्याचा आरोप करत, संबंधित ग्रामपंचायती व ग्रामसेवकांना स्पष्ट आदेश देऊन निधीचे योग्य वाटप करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


यावेळी संस्थेच्या अध्यक्षा, सचिव तसेच अध्यक्षांसह आशिष कुटीनो, मारुती पाटील, भिकाजी गावडे, सुरज पाटील,ऍड.अमृता शेरेगार,मारुती पाऊस्कर, नामदेव फाटक, विजय मासरंकार, राजाराम कांबळे, गोविंद नांगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments