चंदगड/प्रतिनिधी : चंदगड नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांची निवड नुकतीच पार पडली असून नगराध्यक्ष सुनील काणेकर व उपनगराध्यक्ष आयेशा नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी समित्यांचे गठन करण्यात आले.नगरपंचायतीच्या नियमानुसार स्थायी समिती,सार्वजनिक बांधकाम समिती, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती तसेच महिला व बालकल्याण समिती स्थापन करण्यात आल्या असून, प्रत्येक समितीत अनुभवी व कार्यक्षम सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
स्थायी समितीच्या सभापतीपदी सुनील सुभाष काणेकर यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून आयेशा समीर नाईकवाडी, अजिंक्य अरुण पिंपळकर व माधवी उमेश शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नगरातील विकासकामांना गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीच्या सभापतीपदी अजिंक्य अरुण पिंपळकर यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून अबुजर अब्दुलरहीम मदार व सचिन सुभाष सातवणेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.शहरातील पाणीपुरवठा, निचरा व्यवस्था व स्वच्छतेच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सभापतीपदी माधवी उमेश शेलार यांची निवड झाली असून, सदस्य म्हणून एकता श्रीधन दड्डीकर व सुचिता संतोष कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महिला व बालकल्याण विषयक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या समितीच्या सभापतीपदी आयेशा समीर नाईकवाडी यांची निवड झाली असून, उपसभापतीपदी गायत्री सुभाष बल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकंदरीत,या समित्यांच्या निवडीमुळे चंदगड नगरपंचायतीच्या प्रशासनाला बळकटी मिळून शहराच्या विकासाला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments