(जिल्हा परिषद निवडणुकीत ४५ पैकी ४४अर्ज पात्र तर १ अपात्र,पंचायत समितीमध्ये एकूण १२२ नामनिर्देशनांपैकी ११९ पात्र, ३ अपात्र)
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. दिनांक १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची सखोल छाननी करण्यात आली.
जिल्हा परिषद गटांबाबत पाहता, अडकूर, माणगाव, कुदनूर व तुडये या चार गटांमधून एकूण ४५ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. यापैकी १ नामनिर्देशन अपात्र ठरले असून ४४ नामनिर्देशन पात्र ठरली आहेत. पात्र नामनिर्देशनांमधून एकूण २६ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
अडकूर (सर्वसाधारण महिला) गटात १८ पैकी ११, माणगाव (ना.मा. प्रवर्ग महिला) गटात ७ पैकी ४, कुदनूर गटात १४ पैकी ८, तर तुडये गटात ६ पैकी ३ उमेदवार पात्र ठरले आहेत.
पंचायत समिती गणनिहाय नामनिर्देशनांची छाननी करताना गवसे, अडकूर, माणगाव, कोवाड, कुदनूर, तुर्कवाडी, तुडये व हेरे या गणांचा समावेश होता. या सर्व गणांमधून एकूण १२२ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली होती. छाननीअंती ३ नामनिर्देशन पत्रे अपात्र ठरली असून ११९ नामनिर्देशन पत्रे पात्र ठरली आहेत. त्यामधून एकूण ८४ उमेदवार निवडणूक लढविण्यास पात्र ठरले आहेत.
गणनिहाय पाहता, गवसे (अनुसूचित जाती महिला) गणात ६ पैकी ४, अडकूर (सर्वसाधारण) गणात २९ पैकी २२, माणगाव (ना.मा. प्रवर्ग) गणात १३ पैकी ९, कोवाड गणात ४ पैकी ३, कुदनूर (सर्वसाधारण) गणात २५ पैकी १७, तुर्कवाडी (सर्वसाधारण) गणात १८ पैकी १२, तुडये (सर्वसाधारण महिला) गणात १२ पैकी ६, तर हेरे (सर्वसाधारण महिला) गणात १५ पैकी ११ उमेदवार पात्र ठरले आहेत.
नामनिर्देशन छाननीची प्रक्रिया शांततेत व नियमानुसार पार पडली असून आता निवडणूक रिंगणातील चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. अर्ज माघारीनंतर चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची खरी लढत कोणाकोणात होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments