चंदगड : चंदगड तालुक्यातील बागिलगे-रामपूर विद्यालयाने शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेने यंदाही १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत कला क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेत शाळेचे एकूण ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये ४ विद्यार्थी ए ग्रेड, तर २२ विद्यार्थ्यांनी बी ग्रेड मिळवून यश संपादन केले आहे. तर १४ विद्यार्थी सी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले.त्याचप्रमाणे एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षेत ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्ये २ विद्यार्थ्यांनी ए ग्रेड, तर १० विद्यार्थ्यांनी बी ग्रेड मिळवली तर १२विद्यार्थ्यांनी सी ग्रेड मिळाली आहे. दोन्ही स्तरांवरील विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या कला विभागाची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम आणि कला शिक्षक राजेंद्र शिवणगेकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देत सर्जनशीलतेला चालना देण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले. त्यांना ए.बी.नाईकवाडी,व्ही.डी.पाटील, पी.एस.मगदूम,के टी चिंचणगी,एस.जी.पाटील यांचे सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव जे.बी.पाटील व प्रभारी मुख्याध्यापक टी.व्ही.पाटील यांची प्रेरणा मिळाली.

Post a Comment
0 Comments