Type Here to Get Search Results !

संज्योती मळवीकर यांचा उमेदवारीमुळे हेरे पंचायत समिती निवडणुक होणार चुरशीची!

 


उच्चशिक्षित,सामाजिक जाणीव व गावपातळीवरील अनुभव असलेल्या उमेदवाराला संधी द्या-संज्योती मळवीकर


चंदगड/प्रतिनिधी : कित्येक लोकांना आपल्या कर्तृत्व शैलीतून न्याय मिळवून देणारे ऍड. संतोष मळविकर  आपल्या सर्वाना परिचित आहेत, पण आता चर्चा होतीये,संज्योती मळवीकर यांची, तर मग यांच्याबद्दल जाणून घेऊयात...



चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व ऍड. संतोष मळविकर यांच्या पत्नी संज्योती मळवीकर (बी.ए. बी.एड.) यांनी हेरे पंचायत समिती गणात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यांनी याआधी नांदवडे–शेवाळे गावचे सरपंच,माऊली पतसंस्थेचे चेअरमन तसेच शिवसेना पक्षाचे महिला जिल्हा प्रमुख अशी जबाबदारी सांभाळली आहे.सामाजिक व राजकीय क्षेत्रात ओळख निर्माण करून समाजाला एक वेगळी ओळख करून दिली आहे.त्यामुळे महिलांमध्ये वेगळं अस्तित्व निर्माण करून सध्या त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.सध्या भागात प्रचार करताना त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांनी उच्चशिक्षित, सामाजिक जाणीव असलेल्या व गावपातळीवरील अनुभव असलेल्या उमेदवाराला संधी द्या,अशी विनंती मतदारांना केली.एकंदरीत,संज्योती मळवीकर यांना आशीर्वाद देऊन मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन समर्थकांकडून केले जात आहे. महिला नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने ही उमेदवारी महत्त्वाची मानली जात असून, येत्या काळात हेरे पंचायत समिती गणातील निवडणूक लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments