अडकूरच्या प्रगतीसाठी काँग्रेस उमेदवार मैदानात
अडकूर/प्रतिनिधी : अडकूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रिंगणात उतरले असून आमच्या सर्व अनुभवी,कार्यक्षम नेतृत्वालाच संधी देण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचारादरम्यान करण्यात आले.यामध्ये अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातून शीतल विठ्ठलराव उर्फ संभाजीराव देसाई (शिरोलीकर) या अभ्यासू महिला उमेदवार असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत अटीतटीची व निर्णायक होणार आहे.तसेच अडकूर पंचायत समिती मतदारसंघातून शिवाजी सतबा तुपट हे उमेदवार असून,प्रामाणिकपणा,विकासाभिमुख दृष्टिकोन व प्रभावी जनसंपर्कासाठी ते परिचित आहेत.
अडकूर जिल्हा परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही निवडणुकीच्या मैदानात उरतलो असून मतदारांनी योग्य निर्णय घेत आम्हाला एक संधी द्यावी व ‘हात’ या निवडणूक चिन्हावर मतदान करून विजयी करावे असे आवाहन दोनी उमेदवाराकडून करण्यात आले.यावेळी प्रचारादरम्यान शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण, रोजगारनिर्मिती व सामाजिक विकास या क्षेत्रांत भरीव काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments