Type Here to Get Search Results !

महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फार्मसीचा द्वितीय वर्षाचा शुभेच्छा समारंभ संपन्न

 


   

चंदगड : महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तुर्केवाडी ता.चंदगड येथील डी फार्मसी द्वितीय वर्षाचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी विस्तार अधिकारी एम टी कांबळे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना आपण मिळवलेले ज्ञान व कौशल्य याचा समाजासाठी योग्य उपयोग करावा तसेच आपल्या आई-वडिलांचा गुरुजनांचा मान सन्मान ठेवावा व समाजाप्रती कृतज्ञ राहून भूमिका बजावावी व कॉलेजचे स्मरण नेहमी आपण ठेवावे अश्याप्रकारे मत व्यक्त केले.


   

महादेवराव बी एड कॉलेजचे विभागप्रमुख प्रा.ग. गो  प्रधान यांनी विद्यार्थ्यांना रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण योग्य ते कार्य करावे आयुष्यामध्ये कधीही निराश न होता सकारात्मक भूमिका ठेवून आपल्या ध्येयाकडे आपण वाटचाल करावी फार्मसी क्षेत्रामध्ये आपल्याला ज्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत त्याचा आढावा घेत त्यांनी विद्यार्थ्यांना आपण संधीचा योग्य तो फायदा घेऊन आपण आयुष्यामध्ये यशस्वी व्हावे असे सांगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


संस्था प्रतिनिधी अमेय वांद्रे यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना उद्बोधन केले व शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षा संचालिका मृणालिनी वांद्रे  यांनी विद्यार्थ्यांना आपण कॉलेज पासून जरी दूर जात असला तरी कॉलेज आपल्यासाठी नेहमीच सहकार्य करण्यासाठी तत्पर राहील याची ग्वाही दिली व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमांमध्ये डी फार्मसी चे एच ओ डी सागर पाटील,प्राजक्ता पाटील,अनिरुद्ध गावडे संग्राम कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष वेदांत पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,सर्व डी फार्मसीचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकिता खोडवे यांनी केले.तर सूत्रसंचालन मानसी पाटील यांनी केले.आभार पूजा गावडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments