Type Here to Get Search Results !

चंदगड येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक


चंदगड/प्रतिनिधी : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी काँग्रेस पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून आगामी निवडणुकीला महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उबाठा, शेतकरी संघटना या समविचारी पक्षांची एकत्र आघाडी होणार कि स्वबळावर लढणार याची उत्सुकता राजकीय नेत्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांना लागली आहे.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून आमचा सन्मान राखला तर आम्ही आघाडी करू अन्यथा जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढू असा नारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी दिला.ते आगामी निवडणुकी संदर्भात चंदगड येथील काँगेस कार्यालयात तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीत बोलत होते.


यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई,एम.जे. पाटील, जी. बी. पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, विलास पाटील, शंकर ओऊळकर, अशोक जाधव, ॲड. अनंत कांबळे, तात्यासो देसाई, गोविंद पाटील, संदीप नांदवडेकर, कृष्णा पाटील, बसवंत अडकुरकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments