चंदगड : चंदगड येथील दि. न्यू. इंग्लिश स्कूल व नरसिंगराव भुजंगराव पाटील जुनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन,पारितोषिक वितरण,शुभेच्छा समारंभ व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या या सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रारंभी खेडूत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन चंदगडचे नूतन नगराध्यक्ष सुनील काणेकर यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.पी.पाटील होते.यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून शाळेचे कौतुक केले.यावेळी ज्युनिअर कॉलेज व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या कार्यक्रमात विविध प्रकारचे रेकॉर्ड डान्स,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रावर आधारित गाणी,नाटिका, अस्सल मराठी लावण्या सादर करून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन अधोरेखित केल्याने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.
यावेळी यावेळी प्राचार्य आर.पी.पाटील यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कमिटी प्रमुख व सदस्यांचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजिनदार आनंद सुतार, संचालक व ऑडिटर ॲड.प्रा. एन.एस.पाटील, संचालक आर.पी.पाटील, उपनगराध्यक्ष आयशा नाईकवाडी,नगरसेवक सुधीर पिळणकर, नाविद अत्तार, प्रमोद कांबळे, उपप्राचार्य व्ही.एन.कांबळे, प्रा.एस.एम. निळकंठ, प्रा.ए.डी.धायगुडे, प्रा.एस.एम.शेख, प्रा.एन.डी.हदगल, प्रा.दुष्यंत शिंदे, प्रा.दीपक कांबळे, प्रा.व्ही.बी.गावडे, प्रा.जे.व्ही.तेजम, प्रा.ए.एस.नाडगौडा, प्रा.उदय बोकडे, अध्यापक टी.व्ही.खंडाळे, एस.जे. वर्षे, विद्या डोंगरे, जे.जी.पाटील, पवन पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, आजी-माजी प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.अर्चना रेळेकर व अध्यापक संजय साबळे यांनी केले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.बी.सी. शिंगाडे यांनी आभार मानले.



Post a Comment
0 Comments