Type Here to Get Search Results !

उद्या कुद्रेमानी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हनुमान जन्मोत्सव सोहळा


कुद्रेमानी ( प्रतिनिधी ) : कुद्रेमानी येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण व अखंड हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे ४० वे पुष्प भक्तिभावाच्या वातावरणात साजरे होणार आहे. हा पवित्र सोहळा चैत्र शुद्ध द्वादशी ते चैत्र कृष्ण प्रतिपदा या कालावधीत सोमवार दि. ३० मार्च २०२६ ते शुक्रवार दि. ३ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.मानवी समाजाला त्याग, प्रेम, विश्वबंधुत्व व शांततेचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वरी माऊलीच्या कृपाशिर्वादाने हा पारायण सोहळा पार पडणार असून तो हभप बाबुराव महाराज वैजनाथ पाटील व हभप रामचंद्र महाराज रवळू पाटील यांच्या अधिष्ठानाखाली संपन्न होणार आहे.


या पारायण सोहळ्याचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवी मारुती पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पूजन होणार आहे.यावेळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मीताई आर. हेब्बाळकर, काडा अध्यक्ष युवराज कदम, उचगाव ब्लॉक अध्यक्ष बाळू देसूरकर तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोहर बेळगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


या कार्यक्रमानुसार दररोज सकाळी काकडा आरती, ध्वजवंदन, महिला भजनी मंडळ, हरिपाठ, प्रवचन, पंचपदी, कीर्तन व जागर भजन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

सोमवार दि. ३० मार्च : प्रवचन – हभप मधुकर पुंडलिक देवण, कीर्तन – हभप परशराम कनगुटकर महाराज (सोनोली)

मंगळवार दि. ३१ मार्च : प्रवचन व कीर्तन – संतसेवक किरण महाराज खटावकर (संकेश्वर)

बुधवार दि. १ एप्रिल : प्रवचन – हभप वैजनाथ महाराज (कुद्रेमानी), कीर्तन – हभप लहू महाराज (बेळगाव)

गुरुवार दि. २ एप्रिल : प्रवचन – नंदकुमार महाराज (तुर्केवाडी), कीर्तन – हभप हणमंत विष्णू मिसाळ महाराज (सांगली)


सोहळ्यातील महाप्रसादाचे उद्घाटन उद्योजक सदानंद वैजू धामणेकर, संजय कृष्णा राजगोळकर, मलाप्पा निंगाप्पा पाटील, दीपक निंगाप्पा पाटील, धोडिंबा शटुप्पा पाटील, बाळाराम कदम, परशराम जोतिबा बिजगर्णीकर, दत्तू वैजू पाटील, सुरेश विठ्ठल पाटील, विनायक नारायण पाटील, मलाप्पा जांबोटकर, हेमंत कृष्णा पाटील, मल्लवा रघुनाथ पाटील व तुकाराम दत्तू बडसकर यांच्या हस्ते होणार आहे.या धार्मिक सोहळ्याची सांगता शुक्रवार दि. ३ एप्रिल २०२६ रोजी महाप्रसादाने होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments