चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची वाढती ताकद,भाजपसाठी वरचढ,बालेकिल्ला कोणाच्या ताब्यात जाणार?
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील नांदवडे येथे पंचायत समितीच्या नूतन सभापती व उपसभापती यांचा नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.चंदगड मतदारसंघात पंचायत समिती व जिल्हा परिषदमध्ये भाजपला पिछाडीवर टाकत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली.एकंदरीत येणाऱ्या काळात चंदगडच्या राजकारणात डॉ. नंदाताई बाभूळकर व राजेश पाटील हे दोन्ही नेते एकत्र राहिल्यास तालुक्यातील राजकारणाला एक नवी दिशा मिळू शकते. व राष्ट्रवादी काँग्रेसचा गड पुन्हा राखला जाऊ शकतो. त्यासाठी कार्यकर्ते व नेतेमंडळी यांची अचूक बांधणी व महाराष्ट्रातील राजकारण यावर जनतेचा कामाबद्दल कौल यावर पुढची राजकीय समीकरण अवलंबून असणार आहेत
या कार्यक्रमात पंचायत समितीचे सभापती विलास नाईक व उपसभापती संज्योती मळविकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, मधुकर आंबेवाडकर, सदस्या प्रेमा हुलजी, तसेच जिल्हा परिषद सदस्य सौ. रचना गावडे, सौ. विद्याताई पाटील व मानसी भोगण यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजेश पाटील म्हणाले की, “तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. विकासकामांसाठी आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत.”
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड. संतोष मळवीकर यांनी भूषविले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभूळकर,भरमाना गावडा,कलापा भोगण, विलास पाटील,भिकू गावडे, विठोबा गावडे, महादेव प्रसादे, एस. एल. पाटील, राहुल गावडे, जगन्नाथ हुलजी,श्री.शहापूरकर , विनोद पाटील, यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments