चंदगड : चंदगड येथील र. भा.माडखोलकर महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागातील (Batch 2024) विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत नामांकित आयटी कंपन्यांमध्ये आपली निवड निश्चित केली आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
निलेश जानबा गावडे यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये DevOps Engineer म्हणून निवड झाली आहे. तीर्था संजय साळुखे यांची Wipro कंपनीत Analysts Trainee पदावर निवड झाली आहे. आदित्य मष्णू यादव यांची TCS मध्ये Software Engineer Trainee म्हणून निवड झाली असून, ज्ञानेश्वर नंदू नेवगिरे यांची TCS मध्ये Associate Trainee म्हणून निवड झाली आहे. तसेच संजना सट्टूप्पा पेडणेकर यांची Cognizant Technology Solutions मध्ये Software Engineer पदावर निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. व्ही. आजरेकर तसेच प्रा. प्रदीप गवस, प्रा. सचिन गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून त्यांनी हे यश संपादन केले.या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयाच्या वतीने या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments