Type Here to Get Search Results !

पाटणे फाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


चंदगड (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा शाखा चंदगड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती बुधवार दिनांक २९ रोजी पाटणे फाटा, ता. चंदगड येथे उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.


या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नुकतेच निवडून आलेले पंचायत समिती सदस्य तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक १० वाजता मजरे कर्वे येथील महात्मा फुले विद्यालयातून भव्य रॅलीने होणार असून, ही रॅली पाटणे फाटा येथे येऊन समाप्त होणार आहे.


या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष एकनाथ कांबळे तसेच समता सैनिक दलाचे तुकाराम कांबळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments