पुणे : पुण्यातील चंदगड तालुका नागरिक रहिवाशी संघाची दरवर्षीप्रमाणे नवीन कार्यकारणी निवड जाहीर झाली असून यामध्ये अध्यक्ष या पदावर अनिलभाऊ गुंडोपंत दळवी,उपाध्यक्ष-गोविंद सखाराम नाईक,सचिव-विनायक गोविंद अमृस्कर,खजिनदार-गजानन मष्णू गावडे,कार्याध्यक्ष-लक्ष्मण पुंडलिक सावंत यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.सदर निवडीनंतर पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकारिणीचे आभार मानले. व येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारे संघाची व्याप्ती वाढून संघाला चालना देऊ अशी माहिती नूतन अध्यक्ष अनिलभाऊ दळवी यांनी दिली.हजारो चंदगडवाशी सभासद असणारी ही संस्था सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून चंदगडवाशियासाठी हक्काचं व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.या नव्या निवडीनंतर महाराष्ट्र माझा 24 चे संपादक ज्ञानेश्वर पाटील यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या.
पुण्यातील नागरिक रहिवाशी संघ चंदगड तालुका यांच्यावतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.यामध्ये चंदगड तालुक्यातील असंख्य चंदगडवाशी सामील असून हा संघ नेहमी सक्रिय असतो.गरजू लोकांना आर्थिक सहकार्य,वारकऱ्यांना मदत,महिलांना बचत गटातून सुविधा पुरवीणे, महिलांसाठी लकी ड्रा,खेळ पैठणीचा असे विविध कार्यक्रम राबविले जातात.सामाजिक उपक्रमांमधून चंदगड तालुका रहिवासी संघाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे या संघामार्फत पुण्यामध्ये चंदगड भवन उभारण्याचा संकल्प सुरु आहे.



Post a Comment
0 Comments