Type Here to Get Search Results !

अवकाळी वादळी पाऊसामुळे गोठ्याचे मोठे नुकसान



चंदगड : चंदगड तालुक्यात पडलेल्या वादळी मुसळधार पाऊसामुळे बर्‍याच ठिकाणी शेतकर्‍यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.तर काही ठिकाणी पिकांचेही नुकसान झाले आहे.असाच एक प्रकार न्हावेली येथे पहायला मिळाला.अचानकपणे पडलेल्या वादळी पाऊसामुळे न्हावेली गावातील शेतकरी सुरेखा जयराम पाटील यांचे मुख्य घराच्या मागच्या बाजूला असणारे वापरातील राहते घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.यामध्ये बांधकाम केलेली भिंत,थाटासह पत्रे कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे.त्यामुळे या शेतकरी कुटुंबाला मोठा फटका बसला.




याविषयीं अधिक माहिती अशी कि,जांबरे भागातील न्हावेली गावचे रहिवाशी सुरेखा पाटील या काही कामानिमित्त पुण्याला गेल्या होत्या.त्यांनी काही वर्षांपूर्वी जनावरासाठी गोठ्याच्या स्वरूपात बांधकाम केले होते. त्यांनतर त्याचा वापर धान्य व इतर वस्तू ठेवण्यासाठी होऊ लागला.पण नियतीच्या पुढ कोणाचं चालत नाही.त्याप्रमाणे गुरुवारी सायंकाळी पडलेल्या या जोरदार अवकाळी वादळी पाऊसामुळे हा गोठा कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे.त्यामुळे तात्काळ प्रशासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करत नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments