Type Here to Get Search Results !

पेंडिंग सोलर पंपांची जोडणी तात्काळ देण्याची मागणी; बळीराजा शेतकरी संघटनेचे महावितरणला निवेदन


चंदगड प्रतिनिधी  ( रुपेश मऱ्यापगोळ ) :  चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित सोलर पंपांच्या जोडण्या तातडीने देण्यात याव्यात, या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण, कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.


निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या ‘कृषी सोलर पंप’ योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही प्रत्यक्षात पंपांची जोडणी देण्यात मोठा विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठा वेळेत मिळत नाही.चंदगड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला असून काही ठिकाणी कामे सुरू असली तरी अनेक प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून शेतीचे नियोजन विस्कळीत होत आहे.तरी महावितरण प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित सोलर पंप जोडण्या तातडीने पूर्ण कराव्यात, तसेच संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.याबाबत लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही बळीराजा शेतकरी संघटनेने दिले आहे.

Post a Comment

0 Comments