Type Here to Get Search Results !

चंदगड सरकारी दवाखान्यात होतोय बदल,रुग्णांसाठी विविध सेवा सुरु


कोल्हापूर : जिल्ह्याच्या ठिकाणापासून सर्वात जास्त अंतरावर असलेला चंदगड तालुका सोयी सुविधांपासून वंचित असल्याचे बोलले जात होते. पण अलीकडच्या काळात काही विभागांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे.


पूर्वीच्या काळात आरोग्याच्या सोयी सुविधा सुद्धा मर्यादित होत्या. चंदगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हा सरकारी दवाखाना म्हणजे तालुक्यातील मोठा सरकारी दवाखाना आहे. पुढील उपचारासाठी गडहिंग्लज किंवा कोल्हापूर या ठिकाणी शासकीय दवाखान्यामध्ये  जावे लागते.चंदगड ग्रामीण रुग्णालयात सध्या रुग्णांवर विविध आजारांवर  उपचार होत आहेत आणि त्यास रुग्णांचा ही प्रतिसाद मिळत आहे. रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू झालेली असून लवकरच डायलिसिस सुविधेचा प्रारंभ होत आहे.सर्व रक्त चाचण्या मोफत केल्या जातात.मोफत डिलिव्हरी, एक्स-रे,नेत्र तपासणी, आयुष वैद्यकीय सेवा, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, आयसीटीसी विभाग, क्षयरोग तपासणी, अंतर रुग्ण विभाग, सर्पदंश, श्वानदोष उपचार, एच.पी.व्ही. वॅक्सिंन , मोफत ॲम्बुलन्स सेवा इत्यादी विविध सेवा रुग्णांना दिल्या जात आहेत.


रुग्णालय व रुग्णालय परिसरातील स्वच्छतेवर भर दिला जात असून रुग्ण व नातेवाईकांना जलद आणि सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न असून, सध्या रुग्णालयाकडे बालरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ उपलब्ध आहेत. स्त्रीरोग तज्ञांची आवश्यकता भासत आहे. स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध झाल्यास महिलांच्या आरोग्याच्या दर्जेदार सेवा देता येतील. शिवाय रुग्णालयात डिलिव्हरीचे प्रमाण वाढले जाईल. येत्या काही दिवसात दवाखान्याचा कायापालट झाल्याचे दिसून येईल असे नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधिक्षक वर्ग-१ डॉ.रश्मी माळगावकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments