चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुका हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो.तालुक्यातील बहुतांशी जनता ही सरकारी दवाखान्यांवर अवलंबून आहे.या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्रे,उपकेंद्रे येथे रुग्णांवर इलाज केले जातात.चंदगड तालुका आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या सहाय्यक संचालक (प्राथमिक आरोग्य केंद्र) डॉ.सरिता हजारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चंदगड तालुक्याचा दोन दिवशी दौरा दि.14 व दि.15 मे रोजी केला.
या डॉ. सरिता हजारे यांनी चंदगड ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.या आढाव्यामध्ये त्यांनी रुग्णालयातील सर्व विभागांना भेटी देऊन सविस्तर माहिती घेतली व कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.रुग्णालयीन स्वच्छता,सेवा यामध्ये सातत्य ठेवण्याबाबत सुचनाही दिल्या.त्यांच्या सोबत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.देशमुख उपस्थित होते. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.रश्मी माळगावकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करुन दवाखान्याच्या कामकाजाचा आढावा सांगितला.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी.सोमजाळ डॉ. जोहेब मकानदार,डॉ. गजेंद्र पाटील,डॉ.प्रज्ञा सरतापे,डॉ.सुनील हसुरे, अजय वाघेला, प्रदिप कांबळे,अमर पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचलन समुपदेशक विनायक देसाई यांनी केले.

Post a Comment
0 Comments