चंदगड : चंदगड तालुक्यातील न्हावेली गावामध्ये नामनिर्देश फलकाचे अनावरण करण्यात आले.साई डिजिटलचे सर्वेसर्वा जयसिंग हाजगुळकर,महाराष्ट्र माझा 24 चे संपादक ज्ञानेश्वर पाटील,सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर यांच्या संकल्पनेतून न्हावेली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक या नामनिर्देश फलकाचा शुभारंभ करण्यात आला.त्यांचप्रमाणे न्हावेली येथील दोन चौक व गल्लीना अधिकृत नामकरण देण्यात आले.ग्रुप ग्रामपंचायत उमगाव येथे प्रस्ताव देऊन त्यांना मान्यता देत मंजुरी घेण्यात आली.यामध्ये कांबळे गल्लीला शाहूनगर, नांगरे गल्लीला रोहिदास नगर, चव्हाटा चौकाला छत्रपती संभाजी महाराज चौक व गावात रस्त्यातील मुख्य चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी नावे देण्यात आली आहेत.
हा शुभारंभ नवीन लग्न झालेल्या राजेश नांगरे या संपत्नी जोडप्याच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले.यावेळी शुभारंभाला पोलीस पाटील मनोज गावडे,उमगावचे पोलीस पाटील रवींद्र गावडे,रोहन पेडणेकर,रवळू गावडे,नागोजी शिंदे,सायली पेडणेकर,लक्ष्मी शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.या निवडीनंतर न्हावेली ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत असून यासाठी ग्रुप ग्रामपंचायत उमगाव व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Post a Comment
0 Comments